हतनूर धरणाचे ३६ दरवाजे उघडले; सतर्कतेचा इशारा

अमळनेर : गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस पडतो आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रात व धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील तीन दिवस सतत पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने आज सायंकाळी सहा वाजता हतनूर धरणाचे ३६ दरवाजे ६.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात ९१२६७ क्युसेक्स इतका विसर्ग सुरु असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ७२ तास नागरिकांनी नदीकाठी जावू नये. गुरे ढोरे पाण्याच्या प्रवाहात जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. नदीकाठी राहणाऱ्यांनी कुटुंबातील व्यक्ती व गुरे ढोरे सुरक्षित स्थळी हलवावी असे हतनूर धरणाचे शाखा अभियंता एन.पी.महाजन यांनी कळविले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!