
अमळनेर : राज्यात तारीख २१ ऑक्टोबर २०१९ रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर वा जनमत चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल वा ओपिनियन पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे.
तारीख २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण आयोजित करण्यास; तसेच वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. तसेच मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस (४८) तासाच्या कालावधीत कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज (ओपिनियन पोल) किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज प्रसिद्ध करता येणार नाहीत, असे भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.