बनावट सीएससी सेंटर उघडून पीक विमा पावत्या फाडून शेतकऱ्यांची केलेली फसवणूक भोवतेय
अमळनेर : बनावट सीएससी सेंटर उघडून पीक विमा पावत्या फाडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी गिरीश बिरारी याचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा सत्र व अति न्यायाधीश व्ही.आर.जोशी यांनी रद्द केला आहे.
आरोपी गिरीश बिरारी यांनी २०१७ पासून हेडावे, गडखांब, हिंगोणेे, दहिवद, तासखेडा, खोकरपाट, सडावन, वंजारी, नगाव, बिलखेडा, वावडे, मांडळ, मंगरूळ, धानोरा, एकलहरे आदी गावातील सुमारे ६१ शेतकऱ्यांकडून पीक विम्याच्या हप्त्यापोटी १ लाख ५८ हजार ४६५ रुपयांचे हप्ते वसूल करून त्यांच्या ४६ लाख १० हजार ५३३ रुपयांचे पीक विम्याचे नुकसान झाले आहे. वेदांतचे मालक गिरीश विरुद्ध रविंद्र भाऊराव पाटील यांनी अमळनेर पोलीसात फिर्याद दिल्यावरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात होता. सरकारी वकील ॲड.किशोर बागुल मंगरुळकर यांनी त्याचा कॉम्प्युटर मधील डेटा, त्यात तयार बनावट लिंक याबाबत शोध व जप्त करण्यासाठी आरोपीचा जामीन नाकारावा असा युक्तिवाद केला. सदर आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा सत्र व अति न्यायाधीश व्ही.आर.जोशी यांनी रद्द केला आहे. सरकार पक्षातर्फे ॲड.किशोर बागुल मंगरुळकर तर फिर्यादीतर्फे ॲड.सलीम खान यांनी काम पाहिले.