श्री मंगळ ग्रह मंदिरावर नवे ध्वज लावण्याचा मान योगेश पांडव यांना मिळाला

अमळनेेर : येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात श्री मंगळ जन्मोत्सवा निमित्त आज मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे ५ वाजता जळगाव येथील धावपटू सी.ए. डॉ.रविंद्र खैरनार यांनी धर्मपत्नी व मुलासह श्री मंगळ ग्रहाच्या मूर्तीवर विशेष पंचामृत अभिषेक केला. सुशोभित पाळण्यात प्रतिकात्मक स्वरूप बाल श्री मंगळाचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
श्री मंगळ जन्मोत्सवाला मंदिरावर नवे ध्वज लावण्याची परंपरा आहे. यावर्षी नवे ध्वज लावण्याचा मान योगेश पांडव यांना मिळाला होता. त्यांनी वाजत गाजत नवे ध्वज मंदिरात आणले. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संस्थेचे उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी.बाविस्कर, सहसचिव दिलिप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, सौ.जयश्री साबे, सौ.सुनीता कुलकर्णी आदींनी त्यांचे स्वागत करुन मुख्य मंदिरात आणून ध्वज पूजन केले. नंतर मंदिराचे कळसावर व मुख्य प्रवेशद्वारावर ध्वज लावण्यात आला. कार्यक्रमास मुख्य पुरोहित केशव पुराणिक होते. त्यांना प्रसाद भंडारी, तुषार दिक्षित व देवेंद्र वैद्य यांनी सहकार्य केले. यावेळी श्री मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे रविंद्र खैरनार यांनी धावपटू म्हणून मिळविलेल्या यशाबद्दल पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले.