संस्थेला ‘ग्रीन फाउंडेशन’ चा २०२० वर्षाचा पुरस्कार जाहीर
अमळनेर : सन २०२० वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘ग्रीन फाउंडेशन’ या संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात, तालुक्यातील पातोंडा येथील ‘पातोंडा परिसर विकास मंच’ या संस्थेला गाव हित आणि विकासात्मक दृष्टीकोनातून केलेल्या कार्याची दखल घेत ‘ग्रीन फाउंडेशन’ चा २०२० वर्षाचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय, १) डॉ.महेंद्र घागरे- पुणे २) जिव्हाळा फाऊंडेशन, बुधगाव, ता.मिरज, जि.सांगली ३) धनराज रघुनाथ दुर्योधन- शिक्षक, तक्षशिलानगर, ता.राजुरा, जि.चंद्रपूर ४) प्रशांत पाटील- कोल्हापूर ५) अनंत शांती सामाजिक संस्था ६) रयत सामाजिक संस्था ७) सेवा सेवाभावी संस्था ८) श्री साई बालाजी सामाजिक प्रतिष्ठान आदींनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ऑक्टोबर २०२० च्या शेवटच्या आठवड्यात ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणार आहे.
मनपा जळगावचे लेखाधिकारी श्री.कपिल पवार यांच्या संकल्पना व नेतृत्वाखाली दि.५ जुलै २०१५ ला ‘पातोंडा परिसर विकास मंच’ संस्थेची स्थापना करण्यात आली. विकास मंचच्या स्थापनेसाठी मार्गदर्शक प्रा.मगन सूर्यवंशी, कन्हैयालाल थोरात, पी.एल.संदानशिव, ज्ञानेश्वर बोरसे, विलास चव्हाण गुरुजी व स्थानिक कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. पातोंडा परिसर विकास मंच स्थापनेपासूनच परिसरात स्पर्धा परिक्षा चळवळ, नाला खोलीकरण, वृक्ष लागवड, पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीचे कार्य करीत आहे. गावातील तरुणांमध्ये समाज जागृती साठी मोठ्या प्रमाणावर कार्य उभारले आहे. पातोंडा परिसर विकास मंच ला जाहीर झालेला हा पुरस्कार गौरवाची बाब असून अतिशय महत्वाचा सन्मान आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संस्थेचे मार्गदर्शक प्रा.मगन सूर्यवंशी यांनी ग्रीन फाउंडेशन ने आपल्या संस्थेच्या कार्याची दखल घेतली म्हणून आभार मानले आहेत. ग्रीन फाउंडेशन चा हा पुरस्कार एक उभारी देणारा आणि ऊर्जा वाढवून विकास मंचच्या मावळ्यांना प्रोत्साहित करणारा आहे. ग्रीन फाउंडेशन या संस्थेने पातोंडा परिसर विकास मंच च्या कार्याची घेतलेली दखल आणि सन्मान पुरस्कार हा संस्था आणि चळवळीत काम करणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायक असल्याचे मत उपसरपंच तथा पातोंडा परिसर विकास मंचचे सदस्य सोपान लोहार, ग्रा.पं.सदस्य तथा विकास मंचचे सदस्य सागर मोरे, भूषण बिरारी यांनी व्यक्त केले आहे.