शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने ‘बागायत बाजार’ हे ऑनलाइन पोर्टल विकसित

हुसाली टेक्नाॅलॉजी, पुणे यांचे सहकार्याने एका महिन्याचे आत केले ॲप विकसित

अमळनेर : जगाच्या कानाकोप-यात कुठेही असले तरी मातृभूमी विषयीची तळमळ काहींना अजिबात स्वस्थ बसू देत नाही. शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सध्या जर्मनीस्थित असलेले खानदेश चे सुपुत्र डॉ.प्रविण पाटील आणि त्यांचे मित्र डॉ.शांताराम शेणई यांनी आपल्या कल्पनेतून हुसाली टेक्नाॅलॉजी, पुणे यांचे सहकार्याने मोबाइल ॲप विकसित केला आहे. खास शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर ‘बागायत बाजार’ (आपला बाजार आपल्या हातात) हा मोबाइल ॲप सेवेत आला आहे. हुसाली टेक्नाॅलॉजी, पुणे यांनी एका महिन्याचे आत हे ॲप विकसित करुन डॉ.प्रविण पाटील आणि डॉ.शांताराम शेणई यांच्या प्रयत्नांना आशेचा किरण दाखविला आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोक व शेतकर्‍यांसाठी त्यांचा हा नवीन प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना जोडधंदा आणि आधुनिक शेती विषयी माहिती व त्याचे प्रशिक्षण देणे हा त्यामागचा उद्देश आहे.

वेबसाईट आणि ॲप बनविण्यासाठी आम्ही चांगल्या कंपनीच्या शोधात होतो. तेव्हा आमचे म्यूनिकमध्ये राहणारे मित्र प्रितम पाटील यांचेसोबत चर्चा झाली. प्रितम पाटील हे ‘हुसाली टेक्नॉलॉजी ‘ या कंपनीचे प्रतिनिधी आहेत. त्यांना ही कल्पना खुप आवडली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलून कुठलाही नफा न कमवता कमी वेळात वेबसाईट व ॲप बनवून दिले. या सामाजिक योगदानात ‘हुसाली टेक्नॉलॉजी ‘या कंपनीचा हातभार लागला त्याबद्दल सर्व टीमचे खूप खूप आभार !

…..डॉ.प्रविण पाटील आणि डॉ.शांताराम शेणई

डॉ.प्रविण पाटील हे अमळनेर तालुक्यातील तासखेडा व डॉ.शांताराम शेणई हे ठाणे येथील मूळ रहिवासी आहेत. ते स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना त्यांनी अनुभवल्या आहेत. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने ‘बागायत बाजार’ हे ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने शेतकरी एकमेकांसोबत जोडले जातील आणि एका मोठ्या शेतकरी कुटुंबाचा हिस्सा बनतील. या ॲपच्या मदतीने शेतकरी घरबसल्या शेती संबंधित साहित्य, पशु-पक्षी, वाहने आणि ज्या काही वस्तु पडुन पडुन खराब होतात जसे.. पाईप, पंप, शेतीसंबंधित वाहने आदी खरेदी विक्री तसेच भाड्याने देणे-घेणे इत्यादी करू शकतात. साहजिकच शेतक-यांच्या आयुष्यात काही गोष्टी सोप्या आणि कमी खर्चात होतील. आजच्या घडीला शेतकऱ्याला जर बैल, गाय, म्हैस, शेळी सारखे प्राणी विकायचे असतील तर वाहनातूून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन जावे लागते. वाहतूक खर्च करून बाजारात आल्यामुळे तो अनपेक्षित किमतीत विकावा लागतो किंवा पुन्हा खर्च करून घरी परत आणावा लागतो. यात वेळ, श्रम व पैसा खर्च होतो. या अ‍ॅपचा वापर करून जर आपण वस्तू वा प्राण्याविषयी माहिती आणि फोटो पोस्ट केला तर शेतकऱ्याला घरबसल्या ग्राहक मिळेल. विकत घेणारा आणि विकणारा दोघांचाही वेळ, श्रम आणि पैसा वाचेल. एखादा शेतकरी वाहन/ट्रॅक्टर भाड्याने देत असेल तर तो या ॲपचा उपयोग करून वाहना विषयी माहिती पोस्ट करू शकतो आणि त्याला घरबसल्या ग्राहक मिळतील. यात भाड्याने घेणारा आणि देणारा दोघांचाही फायदा होईल अशी अनेक उदाहरणे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना या सर्व सुविधा विनामूल्य मिळणार असून त्यांचा हा उपक्रम सामाजिक कार्यासाठी उपयुक्त ठरेल. वरील सर्व सेवा त्यांनी पहिल्या टप्प्यात ‘फेज-वन’ मध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.

शेतकऱ्यांचा या ॲपला चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढील टप्प्यात अजून काही गोष्टी उपलब्ध करून देणार आहेत. यात,

१. अ‍ॅपद्वारे शेतकऱ्यांना शेती विषयक शासकीय योजनांची माहिती आणि संकेत स्थळ उपलब्ध करून देणे.
२. शेती विषयक चर्चा, शेतकरी फोरम च्या मदतीने शेतकरी एकमेकांना शेतीविषयक सल्ले, प्रश्न विचारू शकतो. जसे पीकावरील रोग, योग्य बियाणे खते विषयी माहिती इत्यादी
३. महिला बचत गट किंवा शेतकरी कुटुंबाने घरी बनवलेल्या वस्तू आणि पदार्थ विक्रीसाठी या ॲपचा उपयोग होऊ शकतो. जसे लोणची, पापड, मसाला, भाज्या, फुले ,फळे इत्यादी
४. शेतीविषयक सेवा आणि व्यापार यासाठी जाहिरात -उदा. बोअरवेल करणारे, बांधकाम करणारे, विहिर खोदणारे, पीक व प्राणी विमा देणारे, बी -बियाणे विकणारे इत्यादींचा

अधिक माहितीसाठी वेबसाइट http://www.bagayatbazaar.com वा https://play.google.com/store/apps/details?id=com.husali.bagayatbazaar ला भेट द्या. वेबसाईट व ॲप साठी www.husali.com या वेबसाईटला संपर्क करा. बागायत बाजार (आपला बाजार आपल्या हातात) ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहन संबंधितांनी केले आहे.

Share this news:

4 thoughts on “शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याच्या हेतूने ‘बागायत बाजार’ हे ऑनलाइन पोर्टल विकसित

  1. Very good initiative and must doing platform for farmers and related society. Very thoughtful work from founders and developers husali technologies. Good luck.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!