समाजकार्य पदवीधर मंडळ संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी मयूर बागुल यांची निवड

अमळनेर : महाराष्ट्रातील व्यावसायिक समाजकार्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक व्यक्तींना व विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असते. मागील पाच वर्षापासून हे कार्य सुरु होते त्याला मूर्त स्वरुपात संघटनात्मक दिशा देण्याचे काम व न्याय मिळवून देण्यासाठी समाजकार्य पदवीधर मंडळाच्या माध्यमातून समाजकार्य क्षेत्रात कार्य केले जाते. हे काम करत असताना कार्यकर्त्याला संस्थेत निर्माण होणाऱ्या समस्या सोडविणे, एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होत असेल तर लोकशाही मार्गाने लढा देऊन त्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळवून देणे. तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतिरीक्त फी वाढी विरोधात कॉलेज प्रशासन किंवा विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा करुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क कमी करणे असे अनेक प्रश्न या समाजकार्य पदवीधर मंडळाच्या वतीने सोडविण्याचे कार्य केले जातात. प्रशासकीय सेवेत जेथे व्यावसायिक समाजकार्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना डावलून पद भरती केले जात असतील तेथे प्रशासन यांना पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे.
आजपर्यंत एम.एस.डब्ल्यू व बी.एस.डब्ल्यू या विद्यार्थ्यांसाठी केलेले सामाजिक कार्य व सेवा पाहता मयूर बाळकृष्ण बागुल यांचे कार्याची दखल घेऊन समाजकार्य पदवीधर मंडळ महाराष्ट्र संघटनेने घेेेेतली आहे. या संघटनेच्या सर्व पदधिकाऱ्यांच्या विचारविनियमाने मयूर बागुल यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. ही निवड व्यावसायिक समाजकार्य क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत राहून पदाला न्याय देण्याचे काम केले जाईल.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!