अध्यक्ष पदी डॉ.रणजित पाटील तर उपाध्यक्ष पदी अमळनेरचे सुनिल वाघ यांचा समावेश

अमळनेर : जळगांव जिल्हा युवा शारिरीक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची सभा जळगाव जिल्हा शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ.प्रदीप तळवलकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघाचे वरिष्ठ सचिव प्रा.राजेश जाधव यांच्या उपस्थितीत नुकतीच जळगांव येथे झाली. या सभेत जळगाव जिल्हा शा.शि.व क्रीडा शिक्षक महासंघ संलग्नित जळगाव जिल्हा युवा शारिरीक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्ष पदी डॉ.रणजित पाटील (जळगांव) यांची निवड झाली आहे.
अन्य कार्यकारिणीत उपाध्यक्ष पदी सुनिल वाघ -अमळनेर व प्रा.समीर घोडेस्वार -जामनेर, सचिव प्रा.हरीश शेळके -जळगाव, क्रार्याध्यक्ष सचिन महाजन -एंरडोल, सहसचिव प्रा.गिरीश पाटील -पाचोरा, प्रा.वसिम बेग -जळगांव, खजिनदार जितेंद्र फिरके -यावल, संघटक मेघशाम शिंदे -भुसावळ, डॉ.सचिन भोसले -भडगांव, डॉ.कांचन विसपुते -जळगांव, सल्लागार राहुल सांळुके -चाळीसगांव, देविदास महाजन -चोपडा, सदस्य युवराज माळी रावेर, संतोष उगले मुक्ताईनगर, संदेश महानुभव धरणगांव, विजयकुमार चौधरी बोदवड, विलास पाटील भुसावळ, संदीप पवार पारोळा, नितीन पाटील जळगांव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली. नव्या कार्यकारिणी चे सर्व जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.
