अमळनेरला आदिवासी एकता संघर्ष समिती व अ.भा.वाल्मिकी पंचायत तर्फे पिडीत युवती मनीषा वाल्मिकीला मेणबत्त्या पेटवून मूक श्रद्धांजली

सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा व पिडीताच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची मागणी

अमळनेर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे युवतीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आदिवासी एकता संघर्ष समिती आणि अखिल भारतीय वाल्मिकी पंचायत तर्फे पिडीत युवती मनीषा वाल्मिकी या तरुणीच्या फोटो समोर मेणबत्त्या पेटवून मूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत पिडीत युवती मनीषा वाल्मिकीला न्याय मिळण्याची मागणी करण्यात आली. यावेळी वाल्मिकी पंचायत चे उप जिल्हाध्यक्ष संदीप धाप यांनी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी व पिडीत तरुणीच्या कुटुंबाला आर्थिक मदत केली जावी असे मत मांडले. आदिवासी एकता संघर्ष समितीच्या प्रदेशाध्यक्षा प्रा जयश्री दाभाडे यांनी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच यु.पी. पोलीस आणि जिल्हाधिकारी प्रशासन यांनी रात्रीच्या वेळी कुटुंबाला विश्वासात न घेता परस्पर अंतिम संस्कार केले त्याबद्दल त्यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून गुन्हे दाखल करण्यात येऊन कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पप्पु भैय्या कलोसे, नितेश जाधव,अशोक सोनवाल, डॅनी जैधे, आदर्श लोहेरे, रवि घोगले, अजय धाप, अर्जुन भुरट, आकाश कलोसे, नरेश घोगले, महेंद्र साळुंके, श्रीकांत साळुंके, अनिल पारधी, मनोज पवार, पुनमचंद पारधी आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!