अमळनेर : काँग्रेसचे नेते राहुुुुल गांधी व प्रियंका गांधी ता.१ ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील सामुहिक बलात्कार पिडित मनिषा वाल्मिकी च्या परिवाराला भेटण्यासाठी गेले असता, उत्तर प्रदेश पोलीसांकडून त्यांना धक्काबुक्की करत अटक करण्यात आली. हा सर्व प्रकार लोकशाहीविरोधी असून देशभर संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात अमळनेर तालुका काँग्रेस पक्ष, जळगाव जिल्हा महिला काँग्रेस तर्फे प्रांताधिकारी यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रा.हितेशजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसनेही निषेध व्यक्त केला. अमळनेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील, शहराध्यक्ष तौसिफ तेली यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर महाराणा प्रताप चौकात योगी सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळूून निषेध व्यक्त करण्यात आला. ‘राहुल गांधी जिंदाबाद..’, ‘योगी सरकार मुर्दाबाद..’, ‘दादागिरी नहीं चलेगी’ च्या घोषणांसह फलकही झळकले.
यावेळी अमळनेर काँग्रेस कमिटीचे ग्रामीण अध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, जळगाव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सुलोचनाताई वाघ, किसान काँग्रेसचे सुभाष पाटील, संदिप घोरपडे, प्रविण जैन, भागवत सूर्यवंशी, अमळनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश पाटील, जिल्हा सचिव हर्षल जाधव, शहराध्यक्ष तौसिफ तेली, कुंदन निकम, कुणाल चौधरी, तिर्थक देसले, इद्रिस भाई, राजु टेलर, शादाब तेली, साजिद लोहार, शाहीद तेली ,अब्दुल पठाण, आदिल सय्यद, शाहीद बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.