ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी बाब
पातोंडा : अमळनेर तााुक्यातील खौशी येथील अनुप डिगंबर बोरसे यांचे चिरंजीव हिमांशू बोरसे याला मेकॅनिकल इंजिनियर मधेेेे एम.एस करण्यासाठी अमेरिकेतील लुशियाना टेक युनिव्हर्सिटी रश्टन येथे काल रात्री मुंबई हून रवाना झाला. हिमांशूने सपकाळ नाॅलेज हब नाशिक येथून बी.ई. केले असून त्याने बी.ई. मेकॅनिकल मधे केलेल्या उत्कृष्ट कामगिरी दाखल त्याला लुशियाना टेक युनिव्हर्सिटी रश्टन यांचे तर्फे एम.एस च्या प्रथम वर्षाकरीता चार लाख रूपये स्काॅलरशीप मंजूर करण्यात आली आहे. सदर अभ्यासक्रम ३० नोव्हेंबर २०२० ते २५ मे २०२३ पर्यंत अडीच वर्षाचा असून लुशियाना युनिव्हर्सिटी तर्फे हिमांशूला पुर्ण स्काॅलरशीप प्राप्त होणार आहे. त्याने प्राप्त केलेल्या यशाचे काका राकेश बोरसे व खौशी ग्रामस्थांमधून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे. सदर बाब ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असल्याची भावना राकेश बोरसे यांनी व्यक्त केली. दिव्यचक्र परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन..!