अमळनेर : विधानसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रात सुमारे आठ कोटीच्या वर मतदार असून ९६ हजाराचे वर मतदान केंद्र आहेत. आज होत असलेल्या या निवडणूकीसाठी सुमारे ६.५ लाख प्रशासकीय कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूकीसाठी महाराष्ट्रभर प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून रात्रंदिवस ताण सहन करुन कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत.
राज्यात भाजपा १६४, राष्ट्रवादी १२१, काँग्रेस १४७, शिवसेना १२३, बसपा २६२, बहुजन वंचित आघाडी २३५, मनसे १०५, एमआयएम ४४, इतर व अपक्ष १९०० चे वर उमेदवार एकूण २८८ मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. या निवडणूकीत मुख्य पक्षच नव्हे तर अपक्ष उमेदवारांमध्ये देखील रंगतदार लढतीचे चित्र आहे. यामुळे २०१९ ची निवडणूक आगळी वेगळी होणार आहे. यापूर्वी झालेल्या निवडणूकीत मोठा खर्च होत असे मात्र या निवडणूकीत खर्चावर असलेल्या नियंत्रणामुळे सर्वच पक्षांनी दामाला मोडीत काढीत खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. काही उमेदवारांच्या भारदस्त सभाही होवू शकल्या नाहीत. जणू राजकारण्यांनी शहरी व ग्रामीण भाग वाटून घेतले होते. एकूण २८८ मतदार संघातील उमेदवारांचा खर्चही त्या मानाने कमी झाला असावा. सध्या भविष्यात राजकारणात पारदर्शकता येईल असे चित्र असले तरी मतदार राजा कोणाला सत्ता देतो यावरच सारं अवलंबून राहणार आहे.