
संगमनेर : हिवरगाव पावसा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते प्रदेश आणि महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाळासाहेब पावसे पाटील यांना नुकताच ‘उजेडाचे मानकरी’ पुरस्कार जाहीर झाला आहे. बाबासाहेब पावसे पाटील हे सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरातील सरपंचांना एकत्रित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन संगमनेर नगर येथील “स्त्री जन्माचे स्वागत करु या” चळवळीच्या प्रणेत्या सुधाताई कांकरिया यांनी पावसे पाटील यांना पुरस्कार जाहीर केला आहे. “स्त्री जन्माचे स्वागत करु या” या चळवळीत मोलाचे योगदान देणा-या या उजेड वाटेवरील ६० सहप्रवाशांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२७ डिसेंबर २०२० रोजी माऊली संकुल, अहमदनगर येथे पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.
