अमळनेर : आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिनानिमित्त येथील शहर व तालुका पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांचे वतीने आज दि. ६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, अमळनेर यांच्या वतीने सकाळी १० वाजता धुळे रोडवरील शासकीय विश्राम गृह येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण, पत्रकार बांधवांचा सत्कार आणि मान्यवरांच्या भेटी आदी उपक्रम होतील. त्यानंतर स्नेहभोजन होणार असल्याचे अध्यक्ष चंद्रकांत काटे, सचिव भटेश्वर वाणी यांनी कळविले आहे.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ यांच्या वतीने सायंकाळी ५ वाजता कै.रावसाहेब नांदेडकर सभागृह येथे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण, पत्रकार बांधवांचा सत्कार होणार असल्याचे अध्यक्ष चेतन राजपूत, सचिव चंद्रकांत पाटील यांनी कळविले आहे.
कार्यक्रमास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय अशा विविध स्तरातील मान्यवर भेटी देणार असून सर्व पत्रकार बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे.