विजयी उमेदवारांनी घेतली आमदार अनिल पाटील यांची भेट
अमळनेर : विधानसभा मतदारसंघात ८९ पैकी ७४ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस ६० व १४ ठिकाणी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा समावेश आहे. सर्व विजयी उमेदवारांनी थेट आमदार अनिल पाटील यांची भेट घेतली. नवनिर्वाचित सदस्यांचा आमदार अनिल भाईदास पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, प्रदेश प्रतिनिधी शिवाजीराव पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, शहर कार्याध्यक्ष विनोद कदम, एल.टी.पाटील, विजय पाटील, डॉ.रामु पाटील, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, विनोद जाधव, निवृत्ती बागुल, प्रदीप पाटील, सोनु पाटील, भूषण भदाणे, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील, सनी गायकवाड यांनी सत्कार केला.
राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुरेश पाटील यांचे एकरुखी ग्रामपंचायतींवर ५ जागा मिळवून वर्चस्व मिळवले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या पॅनलला शिरूड मध्ये घवघवीत यश मिळाले असून सावखेडा येथे राष्ट्रवादी युवक माजी अध्यक्ष अनिल कदम यांचे पॅनल विजयी झाले आहे. खवशी येथे डॉ.श्यामकांत देशमुख यांच्या जन आशिर्वाद प्रगती पॅनलने घवघवीत यश मिळवत ७ पैकी ६ जागांवर पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
महाविकास आघाडीचे अमळनेर मतदारसंघात वर्चस्व सिद्ध करणारी गावे…
अमळनेेर तालुक्यातील मेहेरगाव, धानोरा, बिलखेडा, हिंगोणे खुर्द, हिंगोणे प्र अ, खर्द, खेडी, फाफोरे बुद्रुक सबगव्हान, जुनोने, रामेश्वर बुद्रुक, गांधली, लोण खुर्द, पिळोदे, सारबेटे खु, वाघोदे, रामेश्वर खुर्द, शिरुड, म्हसले, लोणचारम, गडखांब, अंचलवाडी, धावडे, मांडळ, लोणे, कंडारी, खेडी व्यवहारदडे, पातोंडा, नांद्री, सारबेटे बुद्रुक, सारबेटे खु, मुडी दरेगाव, कुर्हे, पळासदळे, निंभोरा, धुपी, बिलखेडा, कळमसरे, कलाली, सोनखेडी, कळंबू, बोदर्डे, शहापूर, जळोद, एकतास, तांदळी, ढेकू खुर्द, झाडी, देवळी, हिंगोणे खु , खवशी, दापोरी बु, जवखेडा आदी गावांवर राष्ट्रवादी पक्ष व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजय नोंदविला आहे.
पारोळा तालुक्यातील सुमठाणे, हिरापूर, भोकरबारी, भिलाली, इंधवे, भोलाने, शिरसोदे, रत्नापिंप्री, शेवगे, शेळावे बु., शेळावे खुर्द, बोदर्डे, वसंतनगर, आंबपिंप्री, महाळपुर, दळवेल, बहादरपूर, जिराळी, पिंपळकोठे, चिखलोड बु, कोळपिंप्री या गावांचे २१ पैकी १८ ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.