खवशी ग्रामपंचायतीवर जन आशिर्वाद प्रगती पॅनलचा विजयी झेंडा

चोख बंदोबस्त व शांततापूर्ण वातावरणात मतमोजणी

अमळनेर : तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. तहसीलदार मिलींद वाघ यांचे मार्गदर्शनाखाली आज नगरपालिकेच्या इंदिरा भवन येथे चोख बंदोबस्त व शांततापूर्ण वातावरणात मतमोजणी पार पडली. निकाल जाहीर होताच चाहत्यांनी आनंद द्विगुणित केला.

तालुक्यातील खवशी ग्रामपंचायतीत सात जागांसाठी एकूण तीन वार्डात दुहेरी लढत झाली. यात, डॉ.श्यामकांत देशमुख प्रणित जन आशिर्वाद प्रगती पॅनलने सहा जागांवर निर्विवाद बहुमत मिळवत विजयी झेंडा रोवला. विजयी उमेदवारांमध्ये जन आशिर्वाद प्रगती पॅनलचे १) धनराज परशुराम पवार २) सौ.आशा अरुण गोसावी ३) सौ.गौरी कैलास पाटील ४) गणेश कन्हैयालाल पाटील ५) सौ.मंदाबाई गुलाब पाटील ६) सौ.जयश्री अरुण देशमुख तर प्रतिस्पर्धी पॅनलचे ७) अनिल पंडीत शिरसाट यांचा समावेश आहे. विजयाचे साक्षीदार होण्यासाठी असंख्य ग्रामस्थांनी हजेरी लावली होती. सर्व विजयी उमेदवारांचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार स्मिताताई वाघ यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विजयश्री खेचून आणण्यासाठी श्यामकांत विनायक देशमुख, अरुण बाबुराव देशमुख, रोहीदास बंडू पाटील, गजानन नाना पाटील, कैलास मुरलीधर पाटील, आनंदा देवराम कापडे, लोटन फकिरा पाटील, हेमकांत पोपट पाटील, धनराज परशुराम पवार, नंदलाल दंगल पाटील, भूषण भाईदास पाटील, विश्वास वामन पाटील, भगवानपुरी छगनपुरी गोसावी, मधुकर नवल पाटील, अरुण रावण पाटील, प्रसाद सुर्यकांत कापडे, आनंदा पवार आदींसह ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!