अमळनेर : मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार म.सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अमळनेर यांचेकडील मार्गदर्शक सुचनेनुसार, जि.प.उच्च प्राथ.शाळा पिंगळवाडे येथे २५ जानेवारी- राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शनिवार दि.२३ जानेवारी रोजी इ. ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘सभी मतदाता बने सशक्त, सतर्क, सुरक्षित एवं जागरूक’ या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कोविड-१९ च्या सूचनांचे पालन म्हणून शाळेत एकत्र न येता विद्यार्थ्यांनी आपल्या घरीच अंगणात किंवा घराच्या दर्शनी जागेवर रांगोळी काढून “सेल्फी विथ रंगोली” या उपक्रमाद्वारे आपल्या वर्गाच्या व्हॉटसअप ग्रुपवर काढलेल्या रांगोळीचा स्वतंत्र व सेल्फी फोटो शेअर करण्याबाबत मुलांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळेतील इ.५ ते ७ वी च्या फक्त मुलींनीच सहभाग न नोंदवता मुलांनीही सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपल्या दारासमोर रांगोळी काढल्यामुळे राष्ट्रीय मतदार दिन फक्त शाळेपर्यंत मर्यादित न राहता संपूर्ण गावात मतदार जागृतीचे वातावरण निर्माण झाले. वर्क फ्रॉम होम व डिजीटल साधनांचा मेळ घालून “सेल्फी विथ रंगोली” चा कार्यक्रम राबवून शाळेने अनोखा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला.
रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर होऊन कु.धनश्री उदेभान पारधी इ.६ वी (प्रथम), कु.श्रुती समाधान पाटील इ.५ वी (द्वितीय), कु.मयुरी किरण पाटील इ.५ वी (तृतीय) क्रमांक पटकावला. व्हॉटसअप द्वारे ऑनलाईन रांगोळी स्पर्धा “Selfie With Rangoli” कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक तथा मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, पदवीधर शिक्षक प्रविण पाटील, उपशिक्षक रविंद्र पाटील, श्रीमती वंदना सोनवणे, इ.५ वी ते ७ वी चे विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी परिश्रम घेतले.