अमळनेर : तालुक्यातील खवशी येथे बांधण्यात आलेल्या रमाई नगर प्रवेशद्वाराचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते शनिवार (ता.३०) रोजी करण्यात आले. यावेळी अमळनेेेर पंचायत समितीचे सदस्य निवृत्ती बागुल, सदस्य विनोद जाधव, एल.टी.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आयु.विजय पवार व व सौ.शर्मिष्ठा पवार यांनी आमदारांसह प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.
खवशी गावचे मूळ रहिवासी तथा युनायटेड इंडिया इन्शुरन्स चे निवृत्त शाखा व्यवस्थापक आयु.विजय नारायण पवार व व सौ.शर्मिष्ठा विजय पवार यांच्या दातृत्वातून समाज ऋण फेडण्यासाठी आई वडील यांच्या सौजन्याने सुमारे अडीच लाख रुपये खर्चून रमाई नगर प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.
आमदार अनिल पाटील यांनी फीत कापून प्रवेशद्वाराचे उद्घाटन केले. ते म्हणाले की, एका छोट्याशा गावात झालेले रमाई नगर प्रवेशदार म्हणजे इतरांना हेवा वाटावा असेच आहे. आमदार नात्याने गाव विकासासाठी मी सदैैव कटिबद्ध आहे. खवशी ते नांद्री पर्यंतचा रस्ता विचाराधीन असून लवकरच दुरुस्त करण्यात येईल तसेच तसेच रमाई नगरातील समाज मंदिर विकासासाठी निधी देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी अरुण देशमुख, शामकांत देशमुख, गजानन पाटील, कैलास पाटील, भगवानपुरी गोसावी, गणेश पाटील, गुलाब पाटील, अनिल शिरसाठ, धनराज पवार, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमाई नगरातील सर्वांनी परिश्रम घेतले.