
अमळनेर : केंद्र सरकारच्या पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस दरवाढी विरोधात अमळनेर शिवसेनेच्या वतीने महाराणा प्रताप चौकात धुळे रोडवर रास्ता रोको करून तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना नुकतेच देण्यात आले. केंद्र शासनाने सामान्य जनता महागाईने त्रस्त असताना पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ करून जनतेला आर्थिक कोंडीत दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने झोपलेल्या सरकारला जागवण्यासाठी विविध घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. हिंदुस्थानात सर्वाधिक पेट्रोल, डिझेलचे दर असून ऐन कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला चटके असह्य होत आहेत. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत अशी रास्त अपेक्षा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे यांनी व्यक्त केली आहे.
या रास्ता रोको आंदोलनात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहर प्रमुख संजय पाटील, महिला आघाडीच्या उप जिल्हा संघटक मनीषा परब, तालुका संघटक संगीता शिंदे, युवा सेनेचे श्रीकांत पाटील, किशोर पाटील, अमर पाटील, प्रताप शिंपी, सरपंच सेनेचे सुरेश पाटील, वैद्यकीय आघाडीचे डॉ.शशिकांत सोनार, व्यापारी सेनेचे जितेंद्र झाबक, विमल बाफना, चंद्रशेखर भावसार, जीवन पवार, मोहन भोई, बोरसे टेलर, रमेश पाटील, टिनू बोरसे, विजय पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुभाष पाटील, आकाश पाटील, रामचंद्र परब, ईश्वर पाटील, मिराबाई मालुसरे, सुनिता माने, वर्षा परब, सोनू सोनवणे, कलाबाई पाटील, मुरलीधर शिरसाठ, लिलाधर कोळी, शशी परदेशी, जयेश पाटील, प्रल्हाद पाटील, पंकज धनगर, हितेश ठाकरे, गौरव माळी, गोपाळ पाटील, पुरुषोत्तम पाटील, विवेक पाटील, रावसाहेब पाटील, जितेंद्र दुसाने आदी शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते.