मुख्य प्रशासक म्हणून राष्ट्रवादीच्या तिलोत्तमा पाटील
अमळनेर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून मुख्य प्रशासक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिलोत्तमा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी सदरची नियुक्ती जाहीर केली आहे.
यात तिलोत्तमा पाटील, भागवत केशव सूर्यवंशी, विजय काशिनाथ पाटील, संभाजी लोटन पाटील, किरण भालेराव पवार, लालचंद त्रंबक पाटील, सुरेश विक्रम पाटील, भाईदास सोनू अहिर, व जितेंद्र प्रेमसिंग राजपूत या नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रसंगी उपनिबंधक गुलाबराव पाटील यांनी प्रशासक मंडळाचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.