उपसरपंचपदी गणेश कन्हैयालाल पाटील यांची वर्णी
अमळनेेेर : तालुक्यातील खवशी ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच पदासाठी बुधवार, दि.१७ रोजी निवड झाली. सरपंच पदासाठी गौरी कैलास पाटील यांचा तर उपसरपंच पदासाठी गणेश कन्हैयालाल पाटील यांंचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रकांत देसले यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचित सदस्य सौ.गौरी कैलास पाटील, सौ.आशा अरुण गोसावी, सौ.मंदाबाई गुलाब पाटील, सौ.जयश्री अरुण देशमुख, गणेश कन्हैयालाल पाटील, धनराज परशुराम पवार, अनिल पंडीत शिरसाट, ग्रामसेविका वारे मॅडम उपस्थित होते.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत डॉ.श्यामकांत देशमुख प्रणित जन आशिर्वाद प्रगती पॅनलने सहा जागांवर निर्विवाद बहुमत मिळवत विजयी झेंडा रोवला होता. सरपंच पद आरक्षणानुसार ‘जनरल’ स्री राखीव जाहीर झाल्याने विजयी उमेदवारांमध्ये सरपंच पदासाठी काहीशी चुरस होती. असे असले तरी सरपंच, उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली. सरपंच पदाच्या या निवडीसाठी सर्वश्री डॉ.श्यामकांत विनायक देशमुख, अरुण बाबुराव देशमुख, गजानन नाना पाटील, कैलास मुरलीधर पाटील, रोहीदास बंडू पाटील, भगवानपुरी छगनपुरी गोसावी, हेमकांत पोपट पाटील यांनी बिनविरोध निवडीसाठी परिश्रम घेतले. निवड प्रसंगी प्रकाश फकिरा पाटील, हरचंद छगनपुरी गोसावी, आनंदा देवराम कापडे, संजय पितांबर कापडे, संजय उत्तम सूर्यवंशी, प्रसाद सुर्यकांत कापडे, पुंडलिक दगा पाटील, कमलेश भूषण पाटील, अरुण गोसावी, संजय भाईदास पाटील, देविदास रामभाऊ पाटील, आबा टेलर, नाना कोळी आदींसह असंख्य ग्रामस्थ हजर होते. निवडीनंतर छ्त्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रम संपला.