अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील रहिवासी तथा माजी पोलीस पाटील परशुराम भोजूू कापडे (जिभाऊ) यांचे सोमवार, ता.८ रोजी सुुुरत येेथे वार्धक्याने निधन झाले. मृत्यू समयी ते ९४ वर्षांचे होते. त्यांचे पाचही मुुुुलांचे निधनानंतर जावई – मुुुलींनी आई वडीलांचा सांभाळ करुन मुुलांची पोकळी जाणवू दिली नाही. त्यांचे पश्चात पत्नी, पाच मुली, जावई, सूना, नातवंडे असा परिवार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम मंगळवार ता.९ रोजी सकाळी ९ वाजता सुुरत येथे करण्यात येेेणार आहे. दशक्रियाविधी, गंधमुक्ती बुधवार ता.१७ रोजी व उत्तरकार्य (तेरावे) शनिवार, ता.२० रोजी सुरत येथे करण्याचे आयोजिले आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !