परिवहन विभाग जळगांव मार्फत जुलै महिन्यात तालुकानिहाय शिबिराचे आयोजन

जुलै २०२१ पासून प्रशासकीय कारणास्तव शिबिर दौऱ्यात बदल

जळगाव : जिल्ह्यातील नागरीकांसाठी दरमहा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव मार्फत तालुकानिहाय मासिक शिबिराचे आयोजन करण्यात येते. माहे जुलै २०२१ पासून प्रशासकीय कारणास्तव या शिबिर दौऱ्यात बदल करण्यात आला असून याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जळगावचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

जुलै २०२१ चे मासिक शिबीराचे कामकाज याप्रमाणे राहील. अमळनेर – पहिला मंगळवार, जामनेर- दुसरा बुधवार, पाचोरा- पहिला व चौथा सोमवार, भुसावळ- पहिला, तिसरा व चौथा गुरुवार, चाळीसगाव- पहिला, दुसरा, चौथा व पाचवा शुक्रवार, यावल – तिसरा सोमवार, सावदा – पहिला बुधवार, चोपडा- दुसरा सोमवार, रावेर – दुसरा मंगळवार, बोदवड – चौथा मंगळवार, भडगाव – चौथा बुधवार, पारोळा – तिसरा शुक्रवार व पाचवा गुरुवार, मुक्ताईनगर – तिसरा मंगळवार, वरणगाव – दुसरा गुरुवार याप्रमाणे दौरा राहील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी असलेला मासिक दौरा पुढील सुयोग्य दिनांकास आवश्यकतेनुसार आयोजित करण्यात येईल, अन्यथा रद्द करण्यात येईल. असेही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!