भुसावळ येथे मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम संपन्न

पत्रकार राजेश पोतदार समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

भुसावळ : केंद्रीय मानवाधिकार संघटना, नवी दिल्ली तर्फे भुसावळ येथील पत्रकार राजेश पोतदार यांना मानवाधिकार क्षेत्रात उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डाॅ. मिलिंद दहिवले यांच्या नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र दौऱ्यात भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात नुकताच मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर, के.एम. टी.व्ही चे सह संचालक श्रीकांत शहारे व त्यांचे कर्मचारी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष संजु भटकर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेश सैनी, जळगाव जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया, जळगाव जिल्हा महासचिव हकीम आर. चौधरी, रावेर तालुका अध्यक्ष महेंद्र महाजन मुक्ताईनगर, तालुका संघटन सचिव विनोद खराटे, गणेश कोळी यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात संजु भटकर यांनी संघटने विषयी विचार व्यक्त केले. राष्ट्रीय संघटन सचिव डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी संघटनेच्या कार्याविषयी माहिती दिली. तर डॉ. मिलिंद दहिवले यांनी संघटनेच्या मानव अधिकार क्षेत्रातील विविध उपक्रमांची माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी राजेश सैनी यांची उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. श्रीमती सुवर्णलता अडकमोल यांना खान्देश रणरागिणी पुरस्काराने गौरविण्यात आले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी विवेक सैनी, भूषण आंबोडकर, हर्षल गोराडकर, किशोर बऱ्हाटे सर, ॲड. कल्पना टेमाणी, प्रांजल पाटील, संतोष यादव आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश पोतदार आणि राजकुमार कांकरिया त्यांनी केले. संजु भटकर यांनी आभार मानले.


Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!