अमळनेर नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांचा तीन वर्षांसाठी अपघात विमा

नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

अमळनेर : कोव्हीड-१९ अंतर्गत अमळनेर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केले. तसेच कोव्हीड-१९ उपाय योजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवसाचा पगार स्वखुषीने जमा करत चांगल्या कार्यास हातभार लावला. ही बाब लक्षात घेऊन लोकनियुक्त नगराध्यक्षा व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी २ जुलै रोजी नगरपरिषदेतील एकूण ५०४ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ओरिएंटल इन्शुरन्स कं. लिमिटेड मार्फत तीन वर्षांसाठी एकूण १८१,०००/- रुपयांचा धनादेश देऊन अपघात विमा काढला.

अपघातात विमाधारक मरण पावल्यास २ लाख रुपये व कायमस्वरूपी विकलांगता आल्यास १ लाख रुपये असे लाभ आहेत. यावेळी नगराध्यक्षा व मुख्याधिकाऱ्यांसह उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल बेडवाल, सोमचंद संदानशिव, राजू चंडाले, प्रसाद शर्मा तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. झालेल्या या निर्णयाबद्दल कर्मचारी वर्गाने समाधान व्यक्त केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!