
अमळनेर : आघाडी सरकार तर्फे मळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासक मंडळाची नेमणूक झालेली आहे. सदर नेमणूक जळगाव जिल्हा पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील व अमळनेर चे भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांच्या शिफारशीने झालेली आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत, पालकमंत्री व भूमिपुत्र आमदार यांच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच झाला. सर्वप्रथम नामदार गुलाबराव पाटील यांचा सत्कार मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांचे हस्ते करण्यात आला. त्यानंतर आमदार अनिल पाटील व कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा सत्कार अनुक्रमे शिवसेना तालुकाध्यक्ष विजय पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.के. सूर्यवंशी यांनी केले. बाजार समितीच्या कार्याविषयी माहिती देताना मुख्य प्रशासक सौ तिलोत्तमा पाटील यांनी सांगितले की, कमी वेळात उत्पन्न वाढीसाठी, लवकरच पातोंडा येथे पेट्रोल पंप सुरू होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा यासाठी गाळण चाळन यंत्र देखील सुरू होणार आहे. शेतमाल साठविण्यासाठी कोल्ड स्टोअरेज सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांच्या कृपेने बाजार समितीत नगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
आमदार अनिल पाटील म्हणाले की, पालकमंत्री हे दूरचे नसून माझे व सर्वांचेच भाऊ आहेत. सर्व महत्त्वाच्या कामात ते मला सहकार्य करीत असल्याने भरपूर कामे होतात. तसेच नामदार गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतात, जिल्हा नियोजन मंडळातील वाढलेला फंड, अमळनेर व धरणगाव नगरपालिकेसाठी दिलेल्या वाढीव फंडाची माहिती दिली. तसेच शाळांच्या कंपाउंड साठी दिलेल्या निधी संबंधी बोलताना, तो निधी कसा आवश्यक आहे ? त्यामुळे होणारे फायदे स्पष्ट केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळा तर्फे संभाजी बापूंनी नामदार गुलाबराव पाटील यांना गाय-वासरूची प्रतिमा प्रदान केली. यावेळी राजू फाफोरेेकर, प्रा.श्याम पवार, प्रा.सुरेश तात्या, संजय पाटील, सुरेश पाटील, महेश देशमुख, तसेच मार्केट कमिटीचे व्यापारी बंधू, कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.के सूर्यवंशी यांनी केले.
