बहुजन रयत परिषदेच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी सुरेश कांबळे

शहराध्यक्ष पदाची जबाबदारी जितू कढरे यांचेकडे

अमळनेर : माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे प्रणित बहुजन रयत परिषदेच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी मातंग समाजातील नेतृत्व सुरेश हिरामण कांबळे यांची तर शहराध्यक्ष पदी जितू शंकर कढरे यांची नुकतीच निवड करण्यात आली. बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बोरसे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली. बहुजन रयत परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष संजय मरसाळे यांचे कोरोनाने निधन झाले असल्याने हे पद अनेक दिवसांपासून रिक्त होते. त्यानंतरच्या काळात शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असणारे सुरेश कांबळे यांच्या कामाची दखल घेत त्यांना तालुकाध्यक्ष पद देण्यात आले. त्यांच्याकडे असलेले शहराध्यक्ष पदाची जबाबदारी जितू कढरे यांचेकडे सोपविण्यात आली आहे. हे दोघेही पदाधिकारी अमळनेर तालुक्यातील मातंग समाजाचे लढवय्ये कार्यकर्ते आहेत. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा..!

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!