
अमळनेेर : येथे दरवर्षी ॲड. ललिताताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र गेली दोन वर्षे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कार्यक्रम करणे शक्य झाले नाही. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मानवी जीवन उध्वस्त झाले आहे. कोरोनाच्या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जावे ? कोरोना काळात सामाजिक बांधिलकी कशाप्रकारे जोपासावी ? या वैफल्यग्रस्त काळात आपल्या जीवनाचा ‘पुनश्च हरिओम’ कशाप्रकारे करता येईल ? यासाठी प्रबोधनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांचे अध्यात्मिक व सामाजिक प्रबोधन पर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. अमळनेर येथील चोपडा रोड वरील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे दि.२६ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. किर्तनाचा लाभ घेण्यासाठी सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड.व्ही.आर.पाटील, महेश पाटील, हिरालाल पाटील, उमेश वाल्हे, शाम अहिरे, प्रफुल्ल पवार, भिकेश पाटील, शितल देशमुख, शरद सोनवणे, जिजाबराव पाटील, निवास मोरे, घन:श्याम पाटील, आयोजक समितीचे सदस्य व जिजाऊ बहुउद्देशिय संस्था यांच्या वतीने करण्यात येत आहे.
