कविता.. तुमच्या मनातली

श्रावण झडी

श्रावणा श्रावणा लोक गंभीर झाले,
उभे पीक शेतात करपले I
कोविडने केले कित्तेक खच्ची,
कशी पोसावीत ही कच्ची बच्ची II

आता जरी.. रान दिसे हिरवे गार,
वै-या सम ऊन करील प्रहार I
चा-या अभावी हे गो धन ठार,
बसेल आमच्याही पोटास मार II

पिकेल शेती तर रोजगार हाती,
नसेल कामधंदा खातील का माती I
कसे करतील जन नित्य व्यवहार,
कधी लग्न, शिक्षण तर प्रसंगी आजार II

किती कर्ज काढू फिटता फिटेना,
दारिद्रय माझे मिटता मिटेना I
जया कडे पाणी तया अर्थ आहे,
पाण्या अभावी जीवन व्यर्थ आहे II

कसे साजरे करावेत सण,
रमेना कुणाचेही कशात मन I
अजूनही वेळ गेलेली नाही,
अशी लाव झडी की.. चिंब होवो दिशा दाही II

************

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!