केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने निषेध; तहसीलदार यांना दिले निवेदन

अमळनेेर : येथील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने मोदी सरकारच्या केंद्रशासनाने केलेल्या गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे काल दि.२१ रोजी निषेध नोंदविण्यात आला. यासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते अग्निशमन दलाच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, भाजपा सरकार केंद्रात आल्यापासुन ते
आजतागायत सामान्य माणसावर फक्त अन्यायच करत आली आहे. तेलाचे भाव असो की दाळीचे भाव असो फक्त वाढ कशी होईल हेच केंद्र सरकार पहात आहे. आता त्यात दिवसेंदिवस भर पडत असून नुकतीच पुन्हा गॅस सिलेंडर भावात २५ रुपयांची वाढ झाली आहेे. कोरोना महामारीच्या काळात लॉकडॉऊन मुळे आधीच सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. काही जणांच्या नोकऱ्या गेल्या, सर्वत्र काम धंदे ठप्प झालेत. परंतु हे सर्व आपल्या प्रधानमंत्री साहेबांना दिसत नाही. आज एका गरीब व्यक्तीला एकवेळ जेवणाची भ्रांत आहे. परंतु यांना फक्त आपल्या तिजोऱ्या भरायच्या आहेत. सामान्य माणुस कसा भरडला जातोय ? याची त्यांना मुळीच चिंता नाही. सामान्य माणसाने जगावं तरी कसे ? आज प्रत्येकाला आपल्या येणाऱ्या दिवसाची चिंता असते. सामान्य माणसाला या भाजपा सरकारने महागाईच्या विळख्यात इतका अडकवला आहे की, तो विरोधासाठी वेळच काढू शकत नाही, ही शोकांतीका आहे. दररोज होणारी भाववाढ ही सामान्य जनतेला परवडणारी नाही. तरी आपल्या स्तरावरुन झालेली ही भाववाढ मागे घेण्याची शिफारस करावी असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर सौ.जयश्रीताई पाटील, सौ.रिता भुपेंद्र बाविस्कर, रंजना प्रवीण देशमुख, योजना जितेंद्र पाटील, आशाताई चावरिया, मंदाकिनी अनिल पाटील, अलका उत्कर्ष पवार, आशा अनिल शिंदे, भारती महेश शिंदे, वैशाली शिवकुमार ससाणे, जलशालीनी प्रकाश महाजन यांचेेेसह मुख्तार खाटीक, बााळू पाटील, संजय पाटील, सुनिल शिंपी, राहुल गोत्राळ, गुणवंत पाटील , रणजित नाना, गोविंद दादा, प्रकाश महाजन आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!