एलपीजी सिलेंडरच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेत नाराजीचं वातावरण

डिसेंबर २०२० पासून आतापर्यंत सिलेंडरच्या दरात जवळपास २७५ रुपयांनी वाढ

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात एकूण २५ रुपयांनी वाढ केली गेली आहे. सर्वसामान्य जनता आधीच महागाईने होरपळलेली असतांना खिसा आणखीनच रिकामा होणार आहे. एकाबाजूला इंधन, खाद्य तेल दरवाढीमुळे अनुषंगिक सर्वच बाबी महागल्या. त्यात आता पुन्हा एकदा सिलेंडरच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामांन्यासमोर जगावे कसे ? हा प्रश्न आहे. सातत्याने होत असलेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेत नाराजीचं वातावरण आहे.

प्रति सिलेंडरचे शहरनिहाय नवे दर…. मुंबईत १४.२ किलो एलपीजी सिलिंडर साठी ८३४.५० रुपये ऐवजी आता ८५९.५० रुपये मोजावे लागणार. दिल्लीत ६९४ रुपये ऐवजी ७१९ रुपये, कोलकातामध्ये ८६१ रुपयांवरून ८८६ रुपये, चेन्नईमध्ये सिलेंडरसाठी ८५०.५० रुपयांवरून ८७५.५० रुपये, लखनऊमध्ये ८७२.५० रुपयांवरून ८९७.५० रुपये, अहमदाबाद, गुजरातमध्ये ८४१.५० रुपयांवरून ८६६.५० रुपये प्रति सिलेंडर किंमत करण्यात आली आहे. व्यावसायिक सिलेंडर ६८ रुपयांनी महागले असून १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी आता दिल्लीत १ हजार ६१८ रुपये मोजावे लागणार आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!