महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ची नवी कार्यकारिणी जाहीर

कार्यकारिणीत सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांचा समावेश

अमळनेर : महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ची राज्य कार्यकारिणी ची बैठक नुकतीच सोमवार, दि.१६ ऑगस्ट २०२१ रोजी टीडीएफचे अध्यक्ष विजय बहाळकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र हायस्कूल, पुणे विद्यार्थी गृह, सदाशिव पेठ, पुणे येथे संपन्न झाली. या बैठकीला टीडीएफ राज्य कार्यकारिणीचे विभागीय अध्यक्ष, सेक्रेटरी तसेच सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, सेक्रेटरी हजर होते. बैठकीत नवीन कार्यकारिणी ची निवड करण्यात आली. निवड झालेल्या नव्या कार्यकारिणीत सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांचाही समावेश आहे.

नवीन कार्यकारिणीत… कार्याध्यक्ष पदी जी.के.थोरात, ता.करमाळा, जि. पुणे यांची तर खजिनदार पदी संदीप घोरपडे, ता.अमळनेर, जि.जळगाव यांची निवड करण्यात आली. अन्य कार्यकारिणी सदस्यांमध्ये…१) के एम ढोमसे, ता. जुन्नर, जि.पुणे २) राजेंद्र लांडे , जि.अहमदनगर ३) आर.बी. वाघ , खांडबारा, जि.नंदुरबार ४) गुफरान अन्सारी, मालेगाव, जि.नाशिक ५) सुरेश खोत, जि.कोल्हापूर यांचा समावेश आहे. टीडीएफ वेबसाईट निर्मितीची जबाबदारी सचिन दुर्गाडे, पिंपरी चिंचवड, पुणे यांना देण्यात आली. निवड झालेल्या सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन हिरालाल पगडाल, कार्यवाह यांनी केले. टीडीएफ च्या खजिनदार पदी सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार गुलाबराव पाटील, संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक सुनिल पाटील, श्रीमती अनिता बोरसे व माजी मुख्याध्यापक सतिश देशमुख व शिक्षक बंधू -भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!