जळगाव : येथील शिक्षक भारती संघटना तर्फे माध्यमिक व प्राथमिक नाशिक विभागातील सर्व पदाधिकारी “गुणवंत शिक्षक पुरस्कार ” वितरण सोहळा कांताई सभागृह, नविन बस स्टॕन्ड जवळ, जळगाव येथे नुकताच (दि.२५) रोजी संंपन्न झाला. यावेळी शिक्षक आमदार मा.कपिल पाटील, मा.अशोक बेलसरे राज्याध्यक्ष, सुभाष मोरे कार्याध्यक्ष, जालिंदर सरोदे प्रमुख कार्यवाह, प्रकाश शेळके कार्यवाह, श्रीमती प्रतिभा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
जळगाव जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार माध्यमिक यादीत.. १. श्रावण चिंधा तेले, के.डी.गायकवाड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर २. शामकांत प्रेमचंद बर्डीकर, गजानन विद्यामंदिर, पारोळा ३. प्रसन्न रमेश खंडाळे, माध्यमिक विद्यालय, कळमडु, चाळीसगाव ४. रविंद्र शांताराम पाटील, माध्यमिक विद्यालय भातखंडे, एरंडोल ५. श्रीमती मीना श्रीराम बडगुजर, न.ह.राका हायस्कूल, बोदवड ६. सुशांत प्रभाकर जगताप, कृ.दे.पाटील विद्यालय गुढे, भडगाव ७. बाळू भटू धाडी, कै.गोटूभाऊ सोनवणे माध्यमिक विद्यालय मोहाडी, जळगाव ८. श्रीमती कल्पना दत्तात्रय देवरे, खूबचंद सागरमल विद्यालय, जळगाव ९. शरद उत्तमराव जगताप, शामराव शिवराम पाटील विद्यामंदिर वडली, चोपडा १०. श्रीमती उज्वला विठ्ठल देशमुख माध्यमिक व उच्चमाध्यमिक कन्या विद्यालय, पाचोरा ११. नाना शंकर पाटील, अहिल्यादेवी कन्या विद्यालय, भुसावळ १२. किरण भीमराव पाटील, न्यू इंग्लिश स्कूल, जामनेर १३. सचिन लोटन सूर्यवंशी, सा.धा.कुडे विद्यालय, धरणगाव १४. नितीन रामकृष्ण माळी, महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय वाघोदा, रावेर १५. सचिनसिंग सुमेरसिंग ठाकूर, संत मुक्ताबाई विद्यालय, मुक्ताईनगर १६. निलांगी जिजाबराव पाटील, माध्यमिक हायस्कुल चुंचाळे, यावल १७. शाह झाकीर अमनुल्लाह, के.के. कन्या उर्दू हायस्कूल, जळगाव १८. सैय्यद युनुस खजीर, भगीरथ केशरलाल सोमाणी माध्यमिक विद्यालय पिंप्राळा, जळगाव १९. श्रीमती प्रतिभा पाटील, श्रीराम माध्यमिक विद्यालय मेहरूण महिला आघाडी २०. श्रीमती वैशाली विपिन झोपे, नंदिनीबाई विद्यालय जळगाव २१. मनोहर कडू पाटील, सानेगुरुजी विद्यालय यावल यांचा समावेश आहे. सर्व पुरस्कार्थींचे दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !