मारवड : महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) अंतर्गत के. व्ही. पटेल कृषी महाविद्यालय, शहादा जि.नंदुरबार येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी कु. प्रज्ञा चंद्रशेखर पाटील हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव २०२१-२२ करीता प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून शेतकऱ्यांच्या शेत-शिवारावर प्रत्यक्ष जाऊन तसेच अमळनेेर तालुक्यातील मारवड व गोवर्धन येथील ग्रामपंचायतीस भेट दिली. तेथील शेतकऱ्यांच्या शेतीसंदर्भात समस्या जाणून घेत कृषी विषयक मार्गदर्शन केले. आधुनिक कृषी ॲपचा वापर व डाउनलोड कसे करावे ? विविध बि-बियाणांची निवड कशी करावी ? याविषयी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मारवड ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच उमेश साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते. सदर विद्यार्थिनीस या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एल. पटेल, कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक सी. यु. पाटील, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.