अमळनेर : येथील भारतीय जनता पार्टी व आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज धुळे रोडवरील विजय मारुती मंदिर येथे शंखनाद आंदोलन करत राज्य सरकारला मंदिरे खुली करण्याचा ईशारा देण्यात आला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व्यवहार सर्वत्र सुरळीत केले जात असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. साहजिकच मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजिविकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाही वा मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशात अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरु आहेत. म्हणुनच देव-धर्मावर सातत्याने अन्याय करणाऱ्या, देवी-देवतांना बंदिस्त करून लाखो गरीबांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा ईशारा देण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष पाटील, युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे, प्रभारी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राकेश पाटील, सरचिटणीस जिजाब पाटील, राहुल पाटील, विजय राजपूत, देवा लांडगे, महेश पाटील, दिलीप ठाकूर, अध्यात्मिक आघाडीचे महेश महाराज, प्रकाश पाटील, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस रवि पाटील, विलास सूर्यवंशी, राहुल चौधरी, समाधान पाटील, हिरालाल पाटील, योगीराज चव्हाण, मिलिंद पाटील, रवि ठाकूर, सौरभ पाटील, निखिल पाटील, जयदीप पाटील, निनाद जोशी आदी सहभागी झाले होते.