विशेष कार्याबद्दल मान्यवरांचाही होणार सत्कार
अमळनेेर : युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत लॉक डाउन काळात मुलांना उत्तेजन मिळावे, जे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम दि.१ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजता आय.एम.ए हॉल, जी.एस.हायस्कूल, अमळनेर येथे आयोजित केला आहे. सदर निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी एच.टी.माळी यांचे अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख अतिथी म्हणून डिगंबर उर्फ राजू महाले, प्रा.डॉ.वंदना पाटील, श्रीमती भारती पाटील उपस्थित राहणार आहेत.
निबंध स्पर्धेसाठी ‘क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले’ व ‘महिला सक्षमीकरणात पुरुषी मानसिकतेची भूमिका’ हे दोन विषय देण्यात आले होते. यात यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व पाच उत्तेजनार्थ बक्षिसे तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. कार्यक्रमात विशेष कार्याबद्दल उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, जि.प.सदस्या जयश्री पाटील, जेडीसीसी बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, संदीप घोरपडे- खजिनदार टीडीएफ, श्री घोडके, भूषण भदाणे, सुनील शिंपी, श्रीनाथ पाटील, सनी गायकवाड, अनिरुद्ध सिसोदे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास नागरिक बंधू भगिनींनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.अशोक पवार, बन्सीलाल भागवत, गौतम मोरे, डी.एम.पाटील, वाल्मिक मराठे, पवार आप्पा, विठ्ठल पाटील, एस.एन.पाटील, सौ.छाया सोनवणे, अशोक इसे, डॉ. राहुल निकम, रणजित शिंदे, संदीप जैन, यतीन पवार यांनी केले आहे.