कवी ना.धों.महानोर यांच्या धर्मपत्नी सुलोचना महानोर यांचे वृद्धापकाळाने निधन

जळगाव : रानातल्या कविता लिहणारे सुप्रसिद्ध कवी पद्मश्री ना.धों.महानोर यांच्या धर्मपत्नी सुलोचना महानोर यांचे आज (दि.१०) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या ७९ वर्षांच्या होत्या. गेली अनेक दिवसांपासून त्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर जळगाव येथे दवाखान्यात उपचार करण्यात आले होते. दरम्यान, तब्ब्येतीत फारशी सुधारणा होत नसल्याने त्यांना औरंगाबाद जिल्ह्यातील ‘पळसखेड’ या गावी शेतावर आणण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पश्चात पती, दोन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. कवी ना.धों.महानोर यांना त्यांची खंबीर साथ मिळाली आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!