गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल विराजमान होणार

अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी काल (ता. ११) राजीनामा दिल्यानंतर नव्या विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी आज आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. मनसुख मांडविया यांच्यासह अन्य नेत्यांची नावे चर्चेत होती मात्र, अनपेक्षितपणे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली आहे. भूपेंद्र पटेल हे गुजरातच्या घाटलोडिया विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार असून ते पाटीदार समाजाचे नेते आहेत. ते अहमदाबादच्या शिलाज येथील रहिवासी आहेत. त्यांनी सिव्हील इंजीनियरिंगचा डिप्लोमा केला आहे.

भाजपचे नेते विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. पुढील वर्षी डिसेंबर २०२२ ला गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधी विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे ही पक्षासाठी पॅचअप मोहीम असल्याचे बोलले जात आहे. उत्तराखंडप्रमाणेच गुजरातमध्येही भाजपने धक्का तंत्राचा वापर करत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. ज्येष्ठ नेते नितीन पटेल हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तरीही भाजपने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने राजकीय निरीक्षकही चक्रावले आहेत.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!