माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या मागणीला यश

अमळनेर : शहराचे माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांच्या मागणीनुसार ओखा पुरी एक्सप्रेस गाडी क्रमांक ०८४०१ / ०८४०२ ला अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचे आदेश नुकतेच पारित झाले आहेत. शहरातील प्रवासी बांधवांची गैरसोय लक्षात घेत, रेल्वे मंत्रालयाच्या प्रवासी सेवा समितीने दि.४ सप्टेंबर रोजी भेट दिली होती. त्यास अनुसरून माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी समितीचे डॉ.राजेंद्रजी फडके, तथा सदस्यांसमक्ष अमळनेर रेल्वे स्थानकावरील विविध समस्यांचा पाढा वाचत या समस्यांचे निरसन करण्याची मागणी केलेली होती.
या समस्यांमध्ये, प्लॅटफॉर्म क्र.१ व २ मधील अंतरामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, प्रवासी पास(चाकरमान्याचे) सुरू करावेे, (mst पास पुन्हा सुरू करावे) तसेच विविध एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्यावा, त्याच प्रमाणे शहरातील नागरिकांना सोईचे व्हावे यासाठी नगरपरिषदेने ग्रामीण रुग्णालय जवळून रस्त्यास मान्यता द्यावी अश्या विविध मागण्या दि.४ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत करण्यात आल्या होत्या. त्यास अनुसरून नगरपरिषदेने ग्रामीण रुग्णालया जवळून रस्त्यास सकारात्मकता दर्शविली आहे. तसेच नुकतीच रेल्वे विभागाचे वतीने ओखा पुरी एक्सप्रेस गाडी क्रमांक ०८४०१ / ०८४०२ ला अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचे आदेश नुकतेच पारित झाले आहेत. याबद्दल माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तसेच रेल्वे प्रवासी सेवा समितीचे डॉ.राजेंद्रजी फडके तथा सर्व सदस्यांचे शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडी च्या वतीने आभार मानले. उर्वरित मागण्यांचीही दखल घेत निरसन करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
