
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा गावचे सुपूत्र शहिद गणेश भिमराव सोनवणे (वय ३६ वर्षे ) याचे काल जम्मू काश्मीर मधील सांबा येथे आकस्मिक निधन झाले. आर्मी सैनिक मराठा बटालियन १४ मध्ये तो सेवेत होता. निधनाची वार्ता समजताच त्याचे कुटुंब व पातोंडा गावावर शोककळा पसरली.
वयाच्या विसाव्या वर्षी गणेश देश सेवेत दाखल झाला होता. त्याने सोळा वर्षे देशसेवा पूर्ण केली होती. देशसेवेचे सतरा वर्षे पूर्ण करुन डिसेंबर मध्ये तो सेवेतून निवृत्ती घेऊन गावी परतणार होता. तत्पूर्वी काळाने त्याच्यावर झडप घातली. सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करून त्याचा मृतदेह विमानाने मुंबईला आणण्यात येणार असून तेथून युुुुनिट सैनिकांच्या निगराणीत रुग्णवाहिकेतून पातोंडा गावी आणण्यात येणार आहे. तेथे उद्या दिनांक ७ रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गणेश च्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली !