अमळनेर : ग्रामीण आणि छोट्या शहरात चित्रकला जोपासली जावी हा उद्देश ठेवून येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात मंगळवार, ता.२९ रोजी चित्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे प्रदर्शनकार तालुक्यातील मंगरुळ येथील मूळ रहिवासी दिनेश अशोक खैरनार आहे. दिनेश आर्टिस्ट झाला असून एका टॅक्सी चालकाचा मुलगाआहे. याकामी त्याला आई, वडिल, मित्र आणि शाळेतील कला शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाले आहे.
मुंबई आणि जळगाव येथील आर्ट गॅलरी मध्ये त्याचे चित्रप्रदर्शन झालेले असून रंग-ध्यास घेेत ग्रामीण आणि छोट्या शहरात चित्रकला जोपासली जावी आणि मुलांना कुठेतरी सर्जनशील गोष्टी अनुभवण्यास मिळावी हा प्रदर्शनाचा उद्देश आहे. कलेबद्दल अजून प्रेम आणि रुची निर्माण व्हावी आणि पालकांनी मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे यासाठी हे मोफत प्रदर्शन आयोजित केेेेले आहे. मार्च २०२० मध्ये मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये पेेंटींगचे प्रदर्शन होणार आहे. तालुक्यातील सर्व विद्यार्थी, पालक व कलेेत अभिरुची असलेेेेेल्यांनी चित्रकला प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेे आहे.