
अमळनेर : राज्यात २ ऑक्टोबर पासून सर्वत्र प्लॉस्टीक बंदी लागू करण्यात आली आहे. शासनाच्या सुचनेप्रमाणे अमळनेर नगरपरिषदेने शहरात प्लॉस्टीक बंदी केली असूनही शहरात प्लॉस्टीक कॅरीबॅग ची विक्री सुरु आहे. न.प. मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद हद्दीत प्लॉस्टीक निर्मूलन पथक तयार केले आहे. या पथकाने ता.२७ रोजी सकाळी ११.३० वाजता सुभाष चौकातील कोमल प्लॉस्टीक सेन्टर येथे पाहणी केली असता, सदर दुकानातून बंदी असलेल्या प्लॉस्टीक कॅरीबॅग आढळून आल्या. त्या जमा केलेल्या प्लॉस्टीक कॅरीबॅग चे वजन ११ किलो १५४ ग्रॅम असून संबंधितावर रुपये ५००० दंड आकारण्यात आला आहे.
सदर कार्यवाहीत आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बि-हाडे यांचे सह अरविंद कदम, राधेश्याम अग्रवाल, विजय सपकाळे संगणक चालक, कर्मचारी चन्दू बि-हाडे, गोपाल बि-हाडे अविनाश बि-हाडे यांनी कार्यवाही केली.