बलिप्रतिपदेनिमित्त महात्मा बळीराजाच्या प्रतिमेची मिरवणूक

अमळनेर : बलिप्रतिपदेनिमित्त येथील बळीराजा गौरव उत्सव समिती तर्फे महात्मा बळीराजाच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बैलगाडी सजवून त्यावर लाकडी नांगरासह बळीराजाची भव्य प्रतिमा ठेवण्यात आली होती. यावेळी ‘ईडा पिडा टळो.. बळीचे राज्य येवो’ च्या घोषणा देण्यात आल्या.
गेल्या दहा वर्षांपासून दर बलिप्रतिपदेला महात्मा बळीराजा चे स्मरण करण्याच्या उद्देशाने बळीराजा उत्सव समितीच्या वतीने अमळनेर शहरातून भव्य मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. शिरुड नाका येथे आमदार अनिलदादा पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जेष्ठ कार्यकर्ते व.ता.पाटील आदींच्या हस्ते बळीराजा प्रतिमेेेचे पूजन करण्यात आले. सोबतच राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिल्पाचे पूजन श्रीमती माई पाटील, अँड. तिलोत्तमा पाटील व स्थानिक महिलांनी केले.

मिरवणूक शहरातील प्रमुख वाडी चौक, पाचपाऊली देवी, बस स्टँड, विश्राम गृह मार्गे बळीराजा स्मारक येथे आणून समारोप करण्यात आला. याप्रसंगी मा.आ.दिलीप सोनवणे, जि.प. सदस्या जयश्री पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील, डी.डी.पाटील, काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ बोरसे, जय अंबे मित्र मंडळाचे दिलीप पाटील, नगरसेवक श्याम पाटील, रणजित शिंदे, विनोद कदम, रा. काँग्रेस अध्यक्ष सचिन पाटील, मनोज पाटील, मुख्तार खाटीक, निलेश साळुंखे, प्रविण श्रीराम पाटील, जयवंत शिसोदे, रामकृष्ण पाटील, शेखा हाजी ,निशांत अग्रवाल, विक्रांत पाटील, सयाजी कापडणीस, प्रशांत निकम, विवेकानंद पाटील, पत्रकार संजय पाटील, भुपेंद्र पाटील, ईश्वर महाजन, डॉ.युवराज पाटील, डी.एम.धनगर, कुंदन पाटील, भिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही समारोपावेळी बळीराजा शिल्पाचे पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
श्रीमती वसुुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना म्हटली. कैलास पाटील यांनी बळीराजा व शेतकरी गीतांचे सवाद्य सादरीकरण केले. प्रा.लीलाधर पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

मिरवणूकीच्या यशस्वीतेसाठी दिलीप पाटील, संजय पाटील, अण्णा शेटे, सुनिल मराठे, नरेंद्र अहिरराव, अनंत सूर्यवंशी, गहिननाथ पाटील, प्रकाश पाटील, पिंटू शेटे, शिवा पाटील, दत्तू अण्णा पाटील, बैलगाडी चालक संजय पाटकरी, भटू पाटील, रविअप्पा महाजन, छोटू महाजन, प्रदिप पाटील, मुकेश वाल्हे, दिलीप कोळी, सोनारबापू वानखेडे आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!