अमळनेर : येथील न्यू प्लॉट भागातील रहिवाशी शुभम राजेंद्र झाबक याने दंत रोग शास्त्रातील ‘एम.डी.एस’ ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून आपल्या मायभूमीत सेवा देण्यासाठी लवकरच अमळनेेर येथे दवाखाना सुरू करणार आहे. डॉ.शुभम हिरड्यां वरील शस्त्रक्रिया तज्ञ असल्याने परिसरातील रुग्णांना प्रथमच पेरिओ डेंटिस्ट इम्प्लांटलॉजी सुविधा अमळनेरातच उपलब्ध होणार आहे.
डॉ.शुभमचे शालेय शिक्षण अमळनेेर येथील जी.एस.हायस्कूल येथे इयत्ता दहावी पर्यंत तर बारावीपर्यंतचे शिक्षण प्रताप महाविद्यालयातून झाले आहे. त्यानंतर नाशिक येथून एम.जी.व्ही.के.बी.एच वैद्यकीय महाविद्यालयातून बी.डी.एस. तर संगमनेर येथील एस.एम.डी.टी वैद्यकीय महाविद्यालयातून एम.डी.एस पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. दरम्यानच्या काळात नाशिक, संगमनेर, वैजापूर अकोले येथे नामांकित शहरात आपली वैद्यकीय सेवा दिली आहे. डॉ.शुभम हा सुरेश एजन्सीचे संचालक राजेंद्र झाबक यांचा लहान मुलगा आहे. त्याच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !