अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील जि.प.मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने नविन समिती गठीत करण्यासाठी शाळेत पालक सभा बोलावण्यात आली होती. अध्यक्षस्थानी खवशीचे सरपंच पती कैलास मुुरलीधर पाटील होते.त्यांचे अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली. सर्वानुमते पुन्हा एकदा प्रसाद सूूूूर्यकांत कापडे यांची अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीत एकूण १४ जणांचा समावेश करण्यात आला असून ५० टक्के महिलांना स्थान देण्यात आले आहे. यात, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचे शिवाय ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून जयश्री अरूण देशमुख, सचिवपदी दिलीप कंखरे, सदस्यपदी जयश्री राकेश मराठे, उज्वला महेंद्र सुर्यवंशी, सुलभा दिनकर पवार, सरला रामचंद्र बागुल, युवराज धनराज पवार, मेहमुद भाईमियाॅ पिंजारी यांचा समावेश आहे. शिक्षक प्रतिनिधी म्हणून पूनम पवार, रोहिदास कापडे -शिक्षण प्रेमी व दोन विद्यार्थी प्रतिनिधी असणार आहेत.
शालेय व्यवस्थापन पालक सभेत निवडप्रसंगी अरूण बाबुराव देशमुख, उपसरपंच गणेश बावीस्कर, सुनिल नाना पाटील, दिनकर पाटील याचेसह पालक महेंद्र गोसावी, राकेश मराठे, रविंद्र वाघ, दिपक सूर्यवंशी, योगराज शिरसाठ, दिनकर पवार, असंख्य पालक, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. आपल्या मागील कार्यकाळात शाळेतील शिक्षकांच्या सहकार्यातून प्रसाद कापडे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अधिक भर देण्याचं काम हाती घेतले असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून शाळेत विद्यार्थ्यांना आरओ चं शुद्ध पाणी, शाळेला तार कंपाउंड, शाळेची देखभाल दुरूस्ती व रंगरंगोटी आदी कामे मार्गी लावली आहेत. भविष्यात देखील शाळेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह सर्वांगीण विकासासाठी लक्ष देेेेणार असल्याचे प्रसाद कापडे यांनी सांगितले. दिव्यचक्र परिवारातर्फे नवनिर्वाचित समितीचे अभिनंदन !