एरंडोल येथील तरुणाचे पुणे येथे अपघाती निधन

एरंडोल : शहरातील लक्ष्मी नगर भागातील रहिवासी व सध्या पुणे येथे एका सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत असलेला तरुण शैलेंद्र गणसिंग राजपूत (वय ४२) याचे पुणे येथे नुकतेच अपघाती निधन झाले. यापूर्वी तो मलेशिया येथे नोकरीस होता. एक वर्षांपासून तो पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाला होता. पुण्यातील डांगे चौकात बुधवारी रात्री ११.३० वाजता दुचाकीवरून जात असताना त्याला डंपरने धडक दिली. या धडकेत डंपरच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यास तातडीने खाजगी फिनीक्स रुग्णालयात व नंतर शासकीय रुग्णालय, औंध येथे हलविण्यात आले. रात्री १२.४५ वाजता मृत झाल्याचे घोषित करण्यात आले. स्व.शैलेंद्र हा माजी ग्रामसेवक गणसिंग रामसिंग राजपुत यांचा एकुलता एक मुलगा होता. तीन दिवसांपूर्वी एरंडोल येथे तो आई, वडील व मित्रपरिवार यांना भेटून आला होता. त्याचे पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. अपघातग्रस्त डंपर ड्रायव्हरने स्वतःहून वाकड पोलीस स्टेशनला हजर झाला असून पुढील तपास सुरू आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!