अमळनेर : येथील साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयातर्फे साहित्यविश्वात बहुचर्चित झालेल्या ‘भुरा’ या डॉक्टर शरद बाविस्कर लिखित आत्मकथनावर आज दि.२९ अॉक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता साने गुरुजी वाचनालय सभागृहात प्रत्यक्ष लेखकाशी जाहीर संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.प्रमोद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून एम.जे.कॉलेज जळगाव चे प्राध्यापक देवेंद्र इंगळे, प्रताप महाविद्यालयाचे प्राध्यापक नितिन पाटील, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक समितीच्या कार्यवाह दर्शना पवार, अॅडव्होकेट सारांश सोनार उपस्थित राहणार आहेत.
साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सहकार्य लाभणार आहे. प्रा.लिलाधर पाटील सुत्रसंचलन करणार आहेत. आयोजन समितीतर्फे कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव प्रकाश वाघ, मसापचे कार्यवाह रमेश पवार, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रा.सुनिल वाघमारे, विद्रोहीचे संपादक गौतम सपकाळे यांनी केले आहे.