
मारवड : अमळनेेर तालुक्यातील मारवड येथील ग्रामविकास शिक्षण मंडळाचे कै. न्हा. म. तु पाटील कला महाविद्यालय चे राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन युवा स्वास्थ्य’ अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरीता कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन दि.२८ अॉक्टोबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड येथे करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, विद्यार्थीनींनी लसीकरणाचे पहीला व दुसरा डोस घेतले.
लसीकरण शिबिरास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले उपस्थित होते. त्यांनी सद्यस्थितीतील लसीकरणाचे महत्व विशद केले. लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सात्विक देशमुख, आरोग्य सहाय्यक डॉ. रामकृष्ण पाटील, आरोग्य सेविका श्रीमती किरण शिरसाठ, डाटा आॅपरेटर राहुल पाटील आदींचे सहकार्य लाभले. शिबिरास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दिलीप कदम, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नंदा कंधारे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. संजय पाटील, विद्यार्थी विकास जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. पवन पाटील, माजी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. जितेंद्र माळी, प्रा. डॉ. संजय महाजन, प्रा. डॉ. माधव वाघमारे, प्रा. डॉ. सतिश पारधी, प्रा. किशोर पाटील आदी उपस्थित होते.