अमळनेेर : येथील ज्येष्ठ पत्रकार गं.का. सोनवणे (काका) यांचे आज दि.३१ आॅक्टोबर रोजी पहाटे तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा गलवाडे रोडवरील मुंदडा नगर २, प्लाट नं ११ येथून दुपारी ४ वाजता निघणार आहे. एक शांत, संयमी, प्रामाणिक माणूस म्हणून त्यांनी भूमिका निभावली. महाराष्ट्र पत्रकार संघात ते सदस्य होते. सतत वाचन व लेखन करणे हा त्यांचा छंदच होता. सानेगुरुजी वाचनालयातर्फे नुकतेच त्यांना सर्वाधिक पुस्तके वाचनाबद्दल ज्येष्ठ वाचक म्हणून सन्मानित करण्यात आले होते. ते पद्मेश सोनवणे यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सहा मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. दिव्यचक्र परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !