बलिप्रतिपदेला अमळनेर येथे सम्राट बळीराजा लोकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

अमळनेेर : ज्या राज्यात ईडा पिडा नाही. दु:ख, दारिद्रय नाही अशा बळीचं राज्य निर्माण व्हावे, सम्राट बळीराजाचे कृतज्ञतापूर्वक स्मरणासाठी सालाबादाप्रमाणे शुक्रवार, दिनांक ०५ नोव्हेंबर २०२१ रोजी सम्राट बळीराजा लोकोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्गा देवी मंदिराजवळ, सप्तश्रृंगी व शिव कॉलनी परिसर अमळनेर येथून सकाळी ९ वाजता लोकोत्सव कार्यक्रमास सुरुवात होईल. जळगाव जिल्हा परिषद सदस्या सौ. जयश्री अनिल पाटील व अमळनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण सौ. पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या हस्ते जिजाऊ पूजन होणार असून अमळनेरचे आमदार भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव धोंडू पाटील यांच्या हस्ते बळीराजा चे पूजन करण्यात येणार आहे.

अमळनेर येथील जय अंबे मित्र मंडळ, तरुण कुढापा मित्र परिवार, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष बापूराव आनंदराव पाटील (ठाकरे सर), प्रकाशक कैलास पाटील सर, दिलीप बी. पाटील, संजय उ. पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!